Dhanori–Lohgaon Residents Protest : धानोरी–लोहगाव भागातील नागरिकांचे मूलभूत सुविधांअभावी PMC समोर आंदोलन
Dhanori Residents Demand Facilities : कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने धानोरी–लोहगाव परिसरातील पाच लाख नागरिकांच्या वतीने PMC समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
पुणे : हजारो रुपयांचा कर वसूल करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तसेच विनंती अर्जांनाही दाद मिळत नसल्याने धानोरी-लोहगाव रहिवासी संघटनेतर्फे पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या भागाची लोकसंख्या सुमारे पाच लाख आहे.