esakal | पुण्यात प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुण्यात प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा ठराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्रीदत्त मंदिर येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्राथमिक विचार विनिमय बैठक नुकतीच झाली. यामध्ये गणेशोत्सव दरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे संकलन व खतनिर्मिती, लोकसहभागातून प्रदूषण मुक्ती, प्लॅस्टिक संकलन, कापडी पिशवीचा वापर, दैनंदिन जीवनात पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर, ओला सुका कचरा व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच यासाठी विविध धार्मिक संस्था, देवस्थान, गणेशोत्सव मंडळ, गृह निर्माण सोसायटीचा सहभाग आणि लोकसहभागातून जनजागृती करत शहराला प्रदूषणमुक्त करणे असा ठराव करण्यात आला.

या प्रसंगी पर्यावरण निर्माल्य गणेशोत्सवाचे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पुण्याचा पर्यावरण नकाशाचे अनावरण करून या निर्माल्य गणेशोत्सवाचा औपचारिक श्रीगणेशा करण्यात आला. तसेच गणेश कलापुरे आणि हेमंत आठवले यांनी जल प्रदूषणासंदर्भात विचार मांडले. यावेळी नदी स्वच्छतेचे व पर्यावरणाचे कार्यकर्ते गणेश कलापुरे, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त राजा बलकवडे, विंचूरकर वाडा लोकमान्य टिळक प्रथम गणपतीचे रवींद्र पठारे, पर्यावरण गतिविधिचे हेमंत आठवले, निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळचे केदार गोरडे, सद्गुरू साई मंदिराचे निरंजन लोंबर, ब्राह्मण संस्थेचे विवेक भालेराव, मकरंद माणकीकर उपस्थित होते.

loading image
go to top