Barti
sakal
पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील अर्जांमधील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आवाहन असे आवाहन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.