Resort Hotels : भामा-आसखेड धरण परिसरात रिसॉर्ट हॉटेल्सचे होतेय हब

बेकायदा बांधकामांना ऊत आणि पाणी प्रदूषणाचा मोठा धोका
bhama aaskhed dam area
bhama aaskhed dam areasakal
Updated on

चाकण - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भामा -आसखेड धरण परिसरात रिसॉर्ट हॉटेल्स, फार्म हाऊस, रेस्टॉरंट यांचं एक हब अगदी धरणा शेजारी धरणाच्या पाण्यालगत उभे आहे.

करंजविहीरे,वाकीतर्फे वाडा, शिवे या गावच्या परिसरात सुमारे तीस ते चाळीस वर हॉटेल,रिसॉर्ट, फार्म हाऊस या नावाने पर्यटन केंद्र, निवासी केंद्र अनेकांनी सुरू केलेली आहेत. त्यामुळे भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात ते सांडपाणी मिसळत आहे.

यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. ही हॉटेल्स बेकायदा आहेत अगदी धरणाच्या पाण्याला धरण क्षेत्रात लागून आहेत त्यामुळे यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांची तसेच पर्यावरण प्रेमींची आहे.

चाकण औद्योगिक वसाहती पासून अगदी बारा, पंधरा किलोमीटर अंतरावर धरणाच्या कुशीत अगदी धरणाच्या पाण्याला खेटून अनेक राजकीय नेते, गुंड, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी काही राजकीय नेत्यांच्या, काही महसूल अधिकाऱ्यांच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने इथे मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट उभारली आहेत.

हॉटेल्स, रिसॉर्ट उभारताना केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलेला आहे. अगदी धरणाच्या पाण्याला खेटून ही हॉटेल्स, रिसॉर्ट उभारली आहेत.ही हॉटेल्स बेकायदा आहेत. त्यामुळे या धरणाच्या पाण्यात या हॉटेल्स,रिसॉर्टचे सांडपाणी मिसळत आहे त्यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित होत आहे.पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हॉटेल्स, रिसॉर्ट उभारताना टेकड्या फोडल्या आहेत. धरणाच्या पाण्यात दगड, मुरमाचा भराव टाकलेले आहेत आणि पाण्याला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. यांना बांधकामाच्या परवानग्या कोणी दिल्या असाही सवाल निर्माण होत आहे. धरण परिसरात अनेक टेकड्यांचा संच आहे आणि खोरी आहेत त्यातून पाणी धरणात येते.

अगदी भामा आसखेड धरणाच्या पाणीसाठ्या जवळ ही हॉटेल्स,रिसॉर्ट असल्याने धरणातील पाणी प्रदूषित होत आहे तसेच पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट उभारताना अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. टेकड्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले आहे काही ठिकाणी दगड,माती मुरुमाचा भराव टाकून पाण्याच्या जागेत सपाटीकरण केलेले आहे.

2010 ला भामानदीवरील भामा आसखेड धरण पहिल्यांदा भरलं. 2015 ला हे धरण पाटबंधारे विभागाने जलसंपदाकडे वर्ग केलं. भामा आसखेड धरणाचे बॅक वॉटर अगदी तीस किलो मीटर अंतरावर पोहोचलेले आहे. धरणाच्या मुख्य भिंतीपासून अगदी एक, दोन-तीन किलोमीटर अंतरावर ही हॉटेल्स, रिसॉर्ट आहेत.

धरण परिसरात हॉटेल्स,रिसॉर्ट, फार्म हाऊस करून धंदा करण्याचा काही लोकांनी प्रयत्न चालविला आहे. बेकायदा बांधकामे करून असे प्रकार केले आहेत. त्याकडे जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे अजिबात लक्ष नाही असा आरोप नागरिकांचा, पर्यावरण प्रेमींचा आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी सांगितले की, 'भामा -आसखेड धरणाचे पाणी पुणे महानगरपालिकेने नेले आहे. पुणे महानगरपालिकेचे जॅकवेल पंप येथे आहे या जॅकवेलला अगदी खेटून एका धनदांडग्याने सुमारे अठरा एकर परिसरात पाण्यात दगड मुरूम मातीचा भराव टाकून मोठे हॉटेल उभारले आहे.

या हॉटेलला कोणतीही परवानगी नाही. पीएमआरडीए ची परवानगी नाही. बेकायदा हॉटेलमध्ये स्विमिंग टॅंक, बोटिंग, हेलिपॅड, रहिवासासाठी अनेक खोल्या आहेत. धरणाच्या पाण्याला खेटून मोठ्या प्रमाणात सिमेंटी बांधकाम केलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या जॅकवेल कडे जाणाऱ्या रस्त्यानेच या हॉटेल कडे जाता येते .

बेकायदा हॉटेल बाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच यापूर्वी संबंधित विभागाकडे पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत यांच्याकडे तक्रार केली आहे.धरण परिसरात बेकायदा हॉटेल विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार आहे. बेकायदा हॉटेलमध्ये खेड तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची संगीत पार्टी ही रंगली जाते.

या बेकायदा हॉटेलचे दर अगदी एका कार्यक्रमाला 70 ते 80 लाख रुपये आहेत. हॉटेलमध्ये मोठ्या स्वरूपाची लग्न होतात तसेच नाच गाण्यांचे कार्यक्रम, रेव्ह पार्ट्या होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. या हॉटेल बाबत खेडच्या माजी आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.परंतु त्यापुढे काही कार्यवाही झाली नाही. कार्यवाही होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.'

खेडच्या महसूल अधिकाऱ्यांच्या पार्टीची चर्चा....

भामा -आसखेड धरण परिसरातील एका बेकायदा हॉटेलमध्ये खेडच्या महसूल अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अगदी संगीतावर, गाण्यावर नाचत जोशात पार्टी केली होती. त्या पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. बेकायदा हॉटेलमध्ये महसूल अधिकाऱ्यांची पार्टी होणे हे योग्य नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी केला आहे.

याबाबत खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी सांगितले की, 'हॉटेल, रिसॉर्ट बेकायदा आहे हे आम्हाला माहीत नाही. आमची पार्टी झाली परंतु ती पार्टी अधिकारी, कर्मचारी यांची होती. पार्टीत काही कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला होता.'

भामा-आसखेड धरणातून पुणे महानगरपालिकेने पाणी उचलले आहे तसेच चाकण औद्योगिक वसाहतीलाही पाणी जात आहे तसेच शेजारच्या गावांना पाणी जात आहे. पिंपरी -चिंचवड महापालिका या धरणावरून पाणी नेणार आहे.

परिसरात हॉटेल्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट फार्म हाऊस बेकायदा होत असल्याने या भागात पर्यावरणाला मोठा धोका पोहोचतो आहे. तसेच सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याकडे संबंधित प्रशासन विभाग लक्ष देणार आहे की नाही असा सवाल पर्यावरण प्रेमीचा तसेच सामाजिक कार्यकर्ते शेलार यांचा आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयशंकर साळुंखे यांनी सांगितले की, 'भामा -आसखेड धरणाच्या पाण्यात हॉटेल, रिसॉर्ट चे सांडपाणी मिसळून प्रदूषण होत असेल. ते पाणी नागरिकांना पिण्यासाठी जात आहे त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे व पाण्यात प्रदूषण होत आहे.

ते प्रदूषण टाळण्यासाठी जे हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस मधून सांडपाणी डायरेक्ट धरणाच्या पाण्यात सोडले जाते. त्या ठिकाणी पाहणी केली जाईल व तात्काळ धरणाच्या पाण्यात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'

भामा -आसखेड धरण प्रकल्पाचे उपअभियंता सचिन गाडे यांनी सांगितले की, 'भामा -आसखेड धरण क्षेत्रात ज्या सरकारी जमिनीत अतिक्रमण ज्या लोकांनी केलेले आहे. त्या सुमारे अकरा लोकांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. दोन-तीन वेळा नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com