
पुणे : ‘‘मराठी भाषा ही प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून मराठी साहित्य, नाटकं, गाणी विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे’’, असे मत विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.