RO Project : आरओ प्रकल्पावरील निर्बंध हटविले; शुद्ध पाण्यासाठी केली नियमावली

महापालिकेने धायरी, नांदेड, किरकटवाडी परिसरातील ३० आरओ प्रकल्पांतील पाणी पिण्यास अपायकारक असल्याने महापालिकेने त्यांना टाळे ठोकले होते.
RO Water Project
RO Water Projectsakal
Updated on

पुणे - शुद्ध पाणी पुरविण्याचा दावा करणाऱ्या आरओ प्रकल्पांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमसाठी (जीबीएस) कारणीभूत असणारा जिवाणू आढळून आल्याने महापालिकेने ३० प्रकल्पांना टाळे ठोकले होते. या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे.

त्यातील अटींची पूर्तता करण्याच्या भरवशावर या प्रकल्पांचे टाळे काढून टाकले आहे. तसेच आता या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाऐवजी क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे.

महापालिकेने धायरी, नांदेड, किरकटवाडी परिसरातील ३० आरओ प्रकल्पांतील पाणी पिण्यास अपायकारक असल्याने महापालिकेने त्यांना टाळे ठोकले होते. हे टाळे महापालिकेने काढावे यासाठी राजकीय दबाव आणला होता, पण महापालिकेने त्यास दाद दिली नाही.

त्यानंतर प्रकल्प चालकांची अधिकाऱ्यांनी महापालिकेत बैठक घेतली होती. त्यात प्रकल्पचालकांचे म्हणणे घेऊन घेण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जर आरओ प्रकल्प पुन्हा सुरू करायचे असल्यास ज्या कंपनीची यंत्रणा आहे ती पुन्हा तपासून घ्यावी, तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी शुध्द करण्यासाठीची ( क्लोरिनेशन ) स्वतंत्र यंत्रणा उभारावी.

या दोन्ही अटींचे हमीपत्रही महापालिकेकडून घेतले जाणार असून त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रकल्प कायमचा बंद केला जाणार असल्याची तंबी प्रकल्प चालकांना देण्यात आली होती. देखभाल दुरुस्ती केल्यानंतर कंपनीकडून प्रमाणपत्र घ्यावे, तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाप्रमाणे शुद्ध पाणी या आरओ प्रकल्पातून झाला पाहिजे असेही सांगण्यात आले होते.

पण यानंतर आता महापालिकेने मवाळ भूमिका घेत त्यांच्यावरील निर्बंध उठविले आहेत. किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, धायरी या भागात महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होता नाही. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी गुणात्मकदृष्ट्या योग्य दर्जाचे पाणी देणाऱ्या व निकषांची पूर्तता करणाऱ्या खासगी आरओ प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची परवानगी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे.

आर ओ प्रकल्पासाठी नियमावली

- आर.ओ प्रकल्पाची महापालिकेकडे नोंदणी आवश्‍यक असून, त्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडे अर्ज करावा

- आर ओ प्रकल्प उत्पादक कंपनीकडून प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती करून त्याचा दाखला घ्यावा

- जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला असावा

- राज्य सार्वजनिक आरोग्यशाळेकडून पाण्याची तपासणी करून घ्यावी.

- आरओ प्रकल्पासाठी महापालिकेकडून अधिकृत बिगर घरगुती पाणी वापरासाठी मिटर घ्यावे

- क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरिक्षकांनी वेळोवेळी पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी

- पाणी दूषित असल्यास संबंधित प्रकल्प बंद करावा

- क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी यावर नियंत्रण ठेवावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com