Accident
AccidentSakal

दौंड - अपघातात सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा मृत्यू

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) सेवानिवृत्त सहायक फौजदार यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला.
Published on
Summary

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) सेवानिवृत्त सहायक फौजदार यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला.

दौंड - दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) (SRPF) सेवानिवृत्त सहायक फौजदार (Assistant Faujdar) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने (Accident) जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ज्या गटात सेवा बजावली त्याच गटाच्या मुख्यालयासमोर त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Accident
किरिट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण; सुरक्षा रक्षक निलंबीत, ३३ जणांच्या बदल्या

राजेंद्र शंकर राक्षे (वय ५५ , रा. दत्तनगर, दौंड, मुळ रा. रेवडी, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. मनमाड - दौंड - बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर एसआरपीएफ गट क्रमांक पाच मुख्यालयासमोरील विश्रामगृह संरक्षक भिंतीजवळ १२ फेब्रुवारी सकाळी सव्वासहा वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक न थांबता निघून गेला. दौंड पोलिस ठाण्यात या बाबत वर्षा राजेंद्र राक्षे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र राक्षे यांनी तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्ती घेतली होती, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार शरद वारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com