
Pune Market Yard
Sakal
मार्केट यार्ड : पुणे बाजार समितीत संचालक मंडळ आल्यापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची चंगळ सुरू झाली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत करार पद्धतीने सेवेत घेण्याचा नवीन फंडा संचालक मंडळाने सुरू केला आहे. आतापर्यंत तीन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेतले असून त्यांना लाखांच्या घरात पगार दिला जात आहे. त्यामुळे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्यात आहे.