परतीच्या प्रवासादरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुणे शहरात घातला धुमाकूळ

परतीच्या प्रवासादरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुणे शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता.
Pune Rain
Pune RainSakal
Summary

परतीच्या प्रवासादरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुणे शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता.

पुणे - परतीच्या प्रवासादरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुणे शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यंदा ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा तिप्पट पावसाची नोंद झाली. गेल्या पाच दशकांमध्ये शिवाजीनगर येथे पावसाचे प्रमाण वाढत असून यामध्ये जून आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याची बाब भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) निरिक्षणातून स्पष्ट झाली.

दरवर्षी शिवाजीनगर येथे ऑक्टोबर महिन्यात सरासरी १०५.३ मिलिमीटर (मिमी) पावसाची नोंद होते. परंतु यंदा तब्बल ३०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय उष्णकटीबंधिय हवामानशास्त्र संस्थेचे माजी शास्त्रज्ञ व ‘टायफून रिसर्च सेंटर’ येथे कार्यरत विनीत कुमार यांनी याबाबत सांगितले, ‘‘शिवाजीनगरमध्ये गेल्या ३० वर्षांतील प्रत्येक दशकातील सरासरी पर्जन्यमानावरून दिसून येते की जून आणि ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यात ऑक्टोबरमध्ये २४ तासांत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात काही वर्षांत वाढ दिसून आली. मागील दहा वर्षांमधील स्थिती पाहता, ऑक्टोबरमध्ये तीनदा २४ तासांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यंदाही १८ ऑक्टोबर रोजी १०४.६ मिमी पावसाची नोंद झाली. इतकंच नाही तर या वर्षी सलग चौथ्यांदा ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.’

ऑक्टोबर महिन्यातील पाऊस (मिलिमीटरमध्ये

२०१८ - ३६

२०१९ - २३५

२०२० - ३१२

२०२१ - १३९.७

२०२२ - ३०३.५

जून ते ऑक्टोबरमध्ये पडणारा पाऊस (मिमीमध्ये)

दशक - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर

१९७१-८० - १३०.६ - १५९.८ - १२९ - १४३.८ - ५८

१९८१-९० - १२९.२ - १६५.३ - १२८.५ - १६६.१ - ७६

१९९१-२००० - २०१.८ - १८६.१ - १०७.२ - १२१.९ - १०४.६

२००१-१० - १९२.६ - १९०.६ - १९५.३ - १५०.५ - ७७.९

२०११-२० - १३८.५ - १७९.१ - ११८.३ - ११८.४ - ८३.६

ऑक्टोबर २०२२ मध्ये २४ तासांत १० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

तारीख - पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

१ ऑकटोबर - ४४.९

११ ऑक्टोबर - १०.७

१५ ऑक्टोबर - ७८.२

१८ ऑक्टोबर - १०४.६

२० ऑक्टोबर - १३.८

२१ ऑक्टोबर - १८.२

महत्त्वाची निरिक्षणे

- साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात ५ ते ६ दिवस पाऊस पडतो

- यंदा मात्र १२ दिवस १ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली

- या पूर्वी ऑक्टोबर १८९२ मध्ये ४४०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

- गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबत आहे

- ला-निनीच्या प्रभावामुळे राज्यातील परतीचा प्रवास लांबत आहे, त्याचबरोबर या काळात सरासरी पावसाचे प्रमाण वाढले

- राज्यात ऑकटोबर महिन्यात सरासरीपेक्षा ८० टक्के अधिक पाऊस

- मागील दहा वर्षातील ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा सर्वाधिक पाऊस पडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com