इंदापूर - इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून 25 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची 39 गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन 2020 पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती.
सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय-48 वर्षे) महसूल सहाय्यक वर्ग 3 तहसील कार्यालय इंदापूर, रा. संघवीनगर, भिगवन रोड, बारामती) यांनी 50 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले.
त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुरूप शुक्रवार (ता. 28) रोजी 5 वाजताच्या दरम्यान सापळा रचून संबंधित महसूल सहाय्यक कावेरी खाडे यांना 25 हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. त्यावरून रात्री उशिरा इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे, पोलीस हवालदार कैलास महामुनकर, वनिता गोरे, चंद्रकांत कदम यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.