esakal | युवकाच्या हृदयामुळे शेतकऱ्याच्या पत्नीला नवजीवन
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Donate

युवकाच्या हृदयामुळे शेतकऱ्याच्या पत्नीला नवजीवन

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - रस्ते अपघातात (Road Accident) गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय युवकाला (Youth) डॉक्टरांनी मेंदूमृत घोषित केले. यामुळे जिवंत असूनही हा तरुण (Youth) जिवंत नव्हता. पिंपरी चिंचवडमधील या युवकाने अवयवदानाचा (Organ Donate) संकल्प केला होता. त्याच्या हृदयदानामुळे सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या पत्नीला नवजीवन मिळाले आहे. (Revival of a Woman due to the Heart of a Youth)

डेक्कन येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नुकतेच हे हृदय प्रत्यार्पण करण्यात आले. त्यासाठी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयातून या तरुणाला ग्रीन कॉरिडॉरद्वारे सह्याद्री रूग्णालयात आणण्यात आले होते. याबाबत रुग्णालयाचे हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यातील २९ वर्षीय महिलेला २०१६ पासून रेस्ट्रीक्टिव्ह कार्डिओमायोपथी या आजाराचा त्रास होता. त्यांची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून खालावत होती. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. हृदय प्रत्यारोपणानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.’ प्रत्यारोपण टीममध्ये डॉ. मनोज दुराईराज, डॉ. राजेश कौशिश आणि डॉ. दीपक भौसार यांचा समावेश होता.

हेही वाचा: Mpscपास झालेल्या स्वप्नीलने आत्महत्या केल्या नंतर सरकारला जाग आली; पाहा व्हिडिओ

सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्रारअली दलाल म्हणाले, ‘हृदय प्रत्यारोपणात सामील झालेली डॉक्टरांची टीम व झेडटीसीसी समन्वयक आरती गोखले, तसेच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही दात्यांच्या कुटुंबीयांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण या कार्यामुळे एका रुग्णाला एक नवसंजीवनी मिळाली आहे.’

loading image