‘परकी सत्तेमुळे अस्मिता नष्ट’

‘परकी सत्तेमुळे अस्मिता नष्ट’
Published on: 

‘‘दीर्घकाळ परकी सत्तेखाली राहिल्याने आपली अस्मिता नष्ट झाली. भूतकाळामध्ये गाडली गेलेली ही अस्मिता आपण जिवंत केली नाही तर भविष्य अंधकारमय होईल. मात्र, आपण ज्ञानपरंपरेत जे सांगितले त्याच्या पुढे गेलो तर मात्र भविष्य उज्ज्वल असेल. धर्मशास्त्रातील कर्तव्य व इतर गोष्टी आजही लागू पडतात. भूतकाळाचा विसर पडू न देणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे मत अभ्यासकांनी ‘समृद्ध इतिहासाकडून उज्ज्वल भविष्याकडे’ या परिसंवादात मांडले. डॉ. सरोजा भाटे, डॉ. निर्मला कुलकर्णी, डॉ.अनघा जोशी या विदुषींनी त्यात सहभाग घेतला. प्रणव गोखले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
---------

प्रतिक्रिया
व्यापकता, सर्वसमावेशकता ही भारतीय ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्ये असून जगभरातील गणिताचे मूळ भारतामध्ये आहे. दशमान पद्धती, शून्याची संकल्पना ही भारताने जगाला दिलेली देणगी असून ऑनलाइन बॅंकिंगसारख्या आधुनिक प्रणालीत वापरली जाणारी ‘रिपिटेड स्क्वेअरिंग मेथड’ (वारंवार वर्ग करण्याची पद्धत) भास्कराचार्यांनी दीड हजार वर्षांपूर्वी शोधून काढली. पाणिनी हा अल्गोरिदमचा पहिला संशोधक, त्याने इ.स.पूर्व पाचव्या शतकात कृत्रिम भाषेचा शोध लावला. युरोपातही त्याचे कौतुक केले जाते, मात्र आपल्याला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही.
- सरोजा भाटे

वेद आणि पुरातत्त्वविद्या परस्परांना पूरक असून भारतीय ज्ञानपरंपरा, पुरातत्त्वविद्या इ.स.पू. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. लोथल हे जगातील सर्वांत प्राचीन बंदर भारतात असल्याचे परदेशी अभ्यासकांकडूनही मान्य करण्यात आले असून मुंबईजवळील घारापुरी येथे अनेक देशांशी संबंध असलेले बंदर सापडले आहे. भारतीयांनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. वेदांची मौखिक परंपरा हे जगातील एक आश्चर्यच. ही परंपरा फक्त भारतात आहे.
- डॉ. निर्मला कुलकर्णी


‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ हा उत्तम सुशासनाचा पाया समजला जातो, यात राजाने स्वत:चा विचार न करता प्रजेचा विचार करावा, देशांनी परस्परांशी संबंध कसे ठेवावेत, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. धर्मशास्त्रात प्रत्येकाची कर्तव्येही सांगितली आहेत. यातील आचार (विवाह, बारसे आदी), व्यवहार (अठरा प्रकारचे वाद) आजही उपयुक्त समजले जाते. धर्मशास्त्रात भागीदारीच्या व्यवसायाचा उल्लेख, नियम असून आधुनिक भागीदारी कायद्यात त्याचे प्रतिबिंब दिसते.
- डॉ. अनघा जोशी

फोटो क्रमांक ः 26W65534

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.