नगर : विषमुक्त शेतीसाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा : डॉ विलास खर्चे

नगर : विषमुक्त शेतीसाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा : डॉ विलास खर्चे
Published on: 

पान ६ नगर
---------------
हरितक्रांतीमुळे जमिनीची
सुपीकता कमी झाली

कुलगुरू डॉ. खर्चे : ‘जैविक निविष्ठांचा वापर करावा’

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : हरितक्रांतीमुळे धान्याच्या उत्पादनात मोठी क्रांती झाली परंतु जमिनीची सुपीकता कमी झाली. विषमुक्त अन्नाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे. शेतकरी गटांनी कीटकनाशक अंशमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा. यामुळे उत्पादन खर्चातही बचत होईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी येथे केले.

महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त कृषी विद्यापीठातर्फे गुहा (ता. राहुरी) येथे शेतकरी मेळावा झाला. त्याप्रसंगी कुलगुरू डॉ. बोलत होते. यावेळी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, भाजीपाला सुधार प्रकल्पाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. शाळिग्राम गांगुर्डे, रोग शास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, चारापिके प्रकल्पाचे गवत संशोधन अधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे उपस्थित होते.

डाॅ. खर्चे यांनी कृषी विद्यापीठात आयोजित थेट पीक प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. शाळिग्राम गांगुर्डे, प्रा. चिमाजी बाचकर, डॉ. विजयकुमार शिंदे, विक्रम पाठक, श्री. खोमणे, डॉ. संतोष कवणे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ सजन यांनी, तर विश्वनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले.

संत सावतामाळी शेतकरी गटाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, गोरक्षनाथ शिंदे यांच्यासह कनगर येथील कणकावती सोयाबीन शेतकरी गट, दवणगाव येथील स्वामी समर्थ शेतकरी गट, क्रांतिसूर्य महिला शेतकरी गट या गटाच्या सदस्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.