हे पुण्यातच होऊ शकतं; नियम तोडणाऱ्यांची तक्रार करणारांना बक्षिस(व्हिडिओ)

हे पुण्यातच होऊ शकतं; नियम तोडणाऱ्यांची तक्रार करणारांना बक्षिस(व्हिडिओ)
Updated on

पुणे ः दुसऱ्यांची चूक पकडण्यात आणि कान टोचण्यात पुणेकर एकदम पटाईत आहेत. त्यांच्या याच गुणाचा वापर करून बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा नंबर आणि छायाचित्र "सतर्क पुणेकर' ऍपवरून पोलिसांना पाठविणाऱ्या तक्रादाराला बक्षीस दिले जाणार आहे. 

शहरात वाहतुकीची शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांचा सन्मान करण्यासाठी नुकतीच "आभार' योजना पोलिसांनी सुरू केली होती. ज्यांच्यावर एकही दंडाची पावती नाही, अशा सुमारे 36 हजार चालकांना "गिफ्ट कूपन' देण्यात आले होते. आता पोलिसांनी सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, ट्रिपलसीट, नो एंट्री, झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, यांसह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे ठरविले आहे. 

वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, सतर्कवरून ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. त्या योग्य असतील त्यांचेच चलन काढले जाईल. हे गिफ्ट कूपन रोज फक्त 50 जणांना दिले जाईल. 

"गिफ्ट कूपन्स' देऊन शिस्तप्रिय चालकांना सन्मान केला. आता नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याचे छायाचित्र ऍपवरून पाठवावे लागेल. तक्रारी देणाऱ्यांपैकी 50 जणांना "गिफ्ट कूपन' दिले जाईल व त्यांचे आभार मानले जाणार आहेत. यामुळे बेशिस्त चालकांना वठणीवर आणता येईल. डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे 

अशी करा तक्रार 
"सतर्क पुणेकर' ऍप वापरा 
ऍपवर नियम तोडणाऱ्या वाहनाचे छायाचित्र व नंबर टाका 
छाननीनंतर ई चलनद्वारे बेशिस्त चालकांवर कारवाई 
वाहतूक पोलिस, सीसीटीव्ही नसल्यास नियम तोडल्यास फटका 
पाच हजार जणांकडून ऍप डाऊनलोड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com