

फोटो ः रेयांश जगताप
जगताप, बावस्करची मानांकितांवर मात
बारा वर्षांखालील टेनिस स्पर्धा
पुणे,ता. १३ ः ऐम. टेनिस अकादमी व नवसह्याद्री क्रीडा संकुल आयोजित एमएसएलटीए - पीएमडीटीए बारा वर्षांखालील गटाच्या अजिंक्यपद सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात रेयांश जगताप व अर्जित बावस्करने मानांकित खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन्स पुणेच्या सहकार्याने एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीएच्या मान्यतेने कर्वेनगर येथील नवसह्याद्री क्रीडा संकुलाच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकित रेयांश जगतापने तिसऱ्या मानांकित अव्यान घुमरेचा ६-२, ६-३ असा तर अर्जित बावस्करने सहाव्या मानांकित रिदित नवलेचा ६-१, ६-१ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. तर दुसऱ्या मानांकित श्रेयस चौतमहालने अर्जुन कोगेकरवर ६-४, १-६, ६-४ असा विजय प्राप्त केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित ईशिता पाटीलने आयरनी शेखचा ६-०, ६-१ असा, सातव्या मानांकित हृदवी लिमकरने मीरा तहलनचा ७-५, ६-३ असा तर काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या समायरा ताम्हाणेने वेदिका भोईटेचा २-६, ६-३, ६-४ असा कडवा प्रतिकार केला.
निकाल : उप-उपांत्यपूर्व फेरी :
मुले : पलाश रुचंदानी (महाराष्ट्र) वि.वि. राजस आंबेकर (महाराष्ट्र) ६-२, ६-१; कियान पेंडुरकर (महाराष्ट्र) वि.वि. मल्हार सानप (महाराष्ट्र) ६-१, ६-२; कबीर पंचमतिया (महाराष्ट्र) वि.वि. अहान नारगोळकर (महाराष्ट्र) ६-२, ६-४; समरवीर सिद्धू (महाराष्ट्र) वि.वि. विआन गोयल (महाराष्ट्र) ६-०, ६-१; देवांश चव्हाण (महाराष्ट्र) वि.वि. रियान पाटील (महाराष्ट्र) ७-६ (३), ६-२; रेयांश जगताप (महाराष्ट्र) वि.वि. अव्यान घुमरे (महाराष्ट्र) ६-२, ६-३; अर्जित बावस्कर (महाराष्ट्र) वि.वि. रिदित नवले (महाराष्ट्र) ६-१, ६-१; श्रेयस चौतमहाल (महाराष्ट्र) वि.वि. अर्जुन कोगेकर (महाराष्ट्र) ६-४, १-६, ६-४. मुली : ईशिता पाटील (महाराष्ट्र) वि.वि. आयरनी शेख (महाराष्ट्र) ६-०, ६-१; हृदवी लिमकर (महाराष्ट्र) वि.वि. मीरा तहलन (महाराष्ट्र) ७-५, ६-३; अक्षिता मठपति (महाराष्ट्र) वि.वि. समिका टेपण (महाराष्ट्र) ६-३, ६-१;
समायरा ताम्हाणे (महाराष्ट्र) वि.वि. वेदिका भोईटे (महाराष्ट्र) २-६, ६-३, ६-४; कनिष्का नारुका (महाराष्ट्र) वि.वि. अनन्या जाधव (महाराष्ट्र) ६-०, ६-२; कायरा गोहिल (महाराष्ट्र) वि.वि. सान्वी गोकर्णकर (महाराष्ट्र) ७-६ (३), ६-२; त्रिशा राजपूत (महाराष्ट्र) वि.वि. ग्यानवी शिवमठ (महाराष्ट्र) ६-१, ६-२; तस्मई पोहाकर (महाराष्ट्र) वि.वि. अन्वी साहू (महाराष्ट्र) ५-७, ६-३, ६-२.
----------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.