खेडच्या पश्चिम पट्ट्यात भात उत्पन्नात घट

खेडच्या पश्चिम पट्ट्यात भात उत्पन्नात घट
Published on: 

चास, ता. १७ : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात कापणीस वेग आला आहे. चालू वर्षी चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बाळगून होता. मात्र, ऐन ओंब्या लगडण्याच्या स्थितीत पावसाअभावी पिकांची स्थिती दयनीय झाली. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याची प्रतिक्रिया चिखलगांव (ता. खेड) येथील शेतकरी बाळासाहेब गोपाळे व ज्ञानदेव गोपाळे यांनी दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात चालू वर्षी जवळपास ३१५० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली गेली होती. पाण्याअभावी ओंब्यांनी लगडलेल्या पिकाला कमी पावसाचा फटका बसल्याने ओंब्यामध्ये दाणेच भरले नाहीत. भात पीक वाळले. शिवाय पिकाच्या वाढीच्या वेळेस करपा, अळीचा प्रादूर्भाव झाल्याने पिकाची वाढही खुंटली. मर रोगाच्याही प्रादुर्भावाने उत्पन्नात मोठी घट झाली. याचा परिणाम उत्पन्नावर झाला असून ५० ते ६० टक्के उत्पन्न कमी होणार आहे. चिखलगांव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गोपाळे म्हणाले की, पावसाअभावी माळरानावरील भातपिके पूर्णपणे जळून गेली असून भाताचा पेंढाही शिल्लक राहिलेला नाही तर कृत्रिम पद्धतीने पाणी देऊन भातपिके जगवली. मात्र, त्यातूनही पन्नास टक्के उत्पन्नात घट झाली असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देऊन बळीराजाला जगवले पाहिजे.
भाताच्या पिकापासून चालू वर्षी उत्पन्न अपेक्षित असताना पावसाअभावी पिके जळून गेली. वर्षभराचे बजेट कोलमडले आहे. जनावरांसाठी भाताचा पेंढाही मिळणार नाही.
- ज्ञानदेव गोपाळे, शेतकरी

05021

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.