कांदळी येथे उभारणार तांदळावर प्रक्रिया करणारा राइस मिल क्लस्टर प्रकल्प

जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील भात उत्पादकांना होणार लाभ
rise mill project
rise mill project sakal

नारायणगाव : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील भात गिरणी धारक यांनी एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्गदर्शनाखाली कांदळी (ता.जुन्नर) औद्योगिक वसाहती जवळ ६ कोटी ६२ लाख रुपये खर्चाचा तांदळावर प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत राइस मिल क्लस्टर प्रकल्प ( समूह उद्योग) उभारण्याच्या कामास सुरवात झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रक्रिया करून उच्च दर्जाची तांदूळ निर्मिती करणे शक्य होणार आहे. या मुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तांदळाला वाढीव भाव मिळणार आहे.या प्रकल्पाचा लाभ प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना होणार असून ग्राहकांना सुध्दा कणी, खडे रहित उच्च दर्जाचा तांदूळ उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते झाले.या वेळी आमदार बेनके , महाराष्ट्र बँकेचे अचल प्रबंधक राहुल वाघमारे यांच्या हस्ते अर्थसाहाय्यतेचा धनादेश संचालक मंडळाला देण्यात आला. प्रकल्पाला जागा उपलब्ध करून देणारे सुहास घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती देवदत्त निकम,सुभाष मोरमारे, कांदळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, उपाध्यक्ष अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र बँकेचे रोहन पानसरे , मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल सावंत,सरपंच विक्रम भोर, राइस मिल क्लस्टरचे अध्यक्ष रमेश वर्पे , संचालक जीवन जाधव , लक्ष्मण देठे ,मधुकर बोऱ्हाडे, विकास दरेकर आदी उपस्थित होते.

आमदार अतुल बेनके म्हणाले शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेती पूरक व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक आहे.या भागात भात लागवडीखाली सुमारे साडेसोळा हजार हेक्टर क्षेत्र आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने हॉलरच्या सहाय्याने साळी पासून तांदूळ निर्मिती करतात. या मुळे तांदुळाचे तुकडे होऊन कणी तयार होते. या मुळे भाव कमी मिळतो , उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.राइस मिल क्लस्टरमध्ये तांदूळावर प्रक्रिया करून लांबी व जाडी नुसार निवड करणे, पॉलिश करणे , वाफ, उकडणे या द्वारे चमकदार तांदूळ निर्मिती करणे शक्य होणार आहे. तुकडा रहित, शुद्ध, चमकदार तांदूळ निर्मिती मुळे प्रतवारी सुधारून मूल्यवाढ होऊन जास्तीचा भाव मिळण्यास मदत होणार आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला आवश्यक ती मदत केली जाईल.

राइस मिल क्लस्टरचे अध्यक्ष रमेश वर्पे म्हणाले प्रकल्प उभारणी खर्च सहा कोटी ६२ लाख रुपये असून शासनाने पाच कोटी ३० लाख रुपये अनुदान दिले आहे. सभासद भाग भांडवल ६६ लाख २६ हजार रुपये असून ६६ लाख २६ हजार रुपये बँक कर्ज घेतले आहे.पाणी, जागा, वीज आदी सुविधा उपलब्ध झाल्याने कांदळी (ता.जुन्नर) औद्योगिक वसाहती जवळ हा उद्योग उभारणीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.या प्रकल्पामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असून भात लागवड वाढण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे नियोजन क्लस्टर चे संचालक सचिन घेवडे यांनी केले. आभार औद्योगिक वसाहतीचे सचिव तुषार पडवळ यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com