

भात पिकात युरिया वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शिवाजी नगर, साखळोली : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय दापोली येथील विद्यार्थीनींच्या संजीवनी गटाच्या वतीने शेतकरी श्री. दिनेश शिवणकर यांच्या भातशेतीमध्ये युरिया DAP ब्रिकेट्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या प्रात्यक्षिकाचा उद्देश शेतकऱ्यांना नत्रयुक्त खतांचा कार्यक्षम वापर व योग्य खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. यावेळी युरिया DAP ब्रिकेट्सचे स्वरूप, वापरण्याची पद्धत व त्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. चार भात रोपांच्या मधोमध एक ब्रिकेट ७ ते १० सेंमी खोलीवर जमिनीत ठेवण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखविण्यात आली. तसेच एका गुंठ्यासाठी सुमारे ६२५ ब्रिकेट्स आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
ब्रिकेट्सच्या वापरामुळे नत्राची कार्यक्षमता वाढण्यास, खताचा अपव्यय व नत्राची धूप कमी करण्यास तसेच भात पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर व कार्यक्षम खत व्यवस्थापनाची पद्धत समजण्यास मदत झाली
कार्यक्रमास शेतकरी व RAWE अंतर्गत संजीवनी गटाच्या विद्यार्थीनी कृतिका ठाकरे, श्रावणी गिम्हवणेकर, कुंजल कांबळे, कृतिका खोडका , वैष्णवी अहिरे, अंजली देवकाते, सानिया खोत, स्वालिहा मुकादम , तेजोन्मयी बलवान, अक्षता कालप यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
सदर कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. डोसानी , कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.