पुणे - भरधाव रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१६) सायंकाळी साडे पाच वाजता पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लता किसन कारंडे (वय-४२, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) असे मृत्यु झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गौरव कारंडे (वय-२१, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता कारंडे या रविवारी (ता. १६) रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पुणे-सोलापूर रस्त्यावरुन पायी जात होत्या. हडपसर भागातील द्राक्ष संशोधन केंद्रासमोरुन त्या रस्ता ओलांडत होत्या.
त्यावेळी कारंडे यांना भरधाव रिक्षाने धडक दिली. या अपघातात, त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.