
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे किरकोळ कारणावरून रिक्षा चालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी दगडाने बेदम मारहाण केल्याने एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. मारहाण करून फरार झालेल्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी तातडीने शोध घेत रिक्षासह ताब्यात घेतले.