Murder : दुचाकीला धक्का लागल्यामुळे रिक्षाचालकाचा खून

दुचाकीला रिक्षाचा धक्का लागल्यामुळे दुचाकीस्वारांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ घडली.
murder
murdersakal
Updated on
Summary

दुचाकीला रिक्षाचा धक्का लागल्यामुळे दुचाकीस्वारांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ घडली.

पुणे - दुचाकीला रिक्षाचा धक्का लागल्यामुळे दुचाकीस्वारांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ घडली. दत्तवाडी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक किरण याचा भाऊ मधुकर दांडेकर यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुकील गफूर शेख (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक किरण, त्याचा भाऊ मधुकर आणि त्याचा मित्र हे सहा फेब्रुवारी रोजी रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी भापकर पेट्रोल पंपाकडे जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार मुकील याला रिक्षाचा धक्का लागला. या कारणावरुन किरण आणि मुकील यांच्यात वाद झाला. त्यावर आरोपी मुकील आणि त्याचा मित्र अरबाज याने किरणला बेदम मारहाण केली. त्यात किरणच्या छातीवर लाथ मारल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघे आरोपी पसार झाले होते. परंतु पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.