रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार झाले अन् उपचार सुरू करण्यापूर्वीच...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

रिक्षाचालकाचा कोयत्याने वार करून खून
कोरेगाव पार्कमधील घटना

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात एका रिक्षा चालकाचा अज्ञातांनी मंगळवारी मध्यरात्री कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राहुल विनायक जगताप (वय ४७) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे रिक्षा चालक आहेत. ते कोरेगाव पार्कमधील कवडेवस्ती लेन नंबर पाच येथे राहत होते. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा घेऊन लेन नंबर पाचमधून जात असताना अचानक आलेल्या हल्लेखोरानी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर काही क्षणांत हल्लेखोर पसार झाले.
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जगताप यांच्या नातेवाइकांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तसेच त्यांचे कोणाशी वाद होते याबाबत माहिती पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw drivers murder in Koregaon Park Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: