
पुणे : राज्य सरकारने ई-बाइक टॅक्सीला दिलेली परवानगी, रिक्षा व टॅक्सीसाठी मीटरनुसार दर लागू करूनही कंपन्यांकडून ते ॲपवर प्रदर्शित केले जात नसल्यामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये होणारे वाद, या व अन्य मागण्यांसाठी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे.