Rickshaw Driver Agitation : रिक्षा संघटना एकवटल्या! बाईक, टॅक्सीविरोधात सोमवारपासून रिक्षाचालकांचे आंदोलन, परिवहनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी आणि रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय न घेणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी रिक्षा संघटना झाल्या आक्रमक.
rickshaw drivers agitation

rickshaw drivers agitation

ESakal

Updated on: 

पुणे - बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी आणि रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय न घेणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुणे जिल्हा रिक्षाचालक मालक कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (ता. २३) पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोरही निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Loading content, please wait...