विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत रायफल व तलवारींचा नाच

crime-logo.jpg
crime-logo.jpg
Updated on: 

पिंपरी (पुणे) : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निगडीत रविवारी (ता. 2) रात्री काढलेल्या शोभा यात्रेत एअर रायफल व तलवारी मिरविण्यात आल्या. याप्रकरणी परिषदेचे पदाधिकारी व 250 कार्यकर्त्यांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे व जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत निगडीतील अंकुश चौक ते यमुनानगर येथील ठाकरे मैदानादरम्यान परिषदेच्या वतीने विनापरवाना शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेतील चार मुलींच्या हातातील एअर राईफलचे ट्रीगर दाबताच आवाज येत होता. तसेच पाच मुली हातात तलवार घेऊन मिरवत असताना घोषणा देत होत्या.
 

पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शस्त्र बाळगण्यास बंद आहे. मात्र, परिषदेच्या कार्यक्रमात या आदेशाचा भंग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Aspirants Continue Their Protest in Pune While Demanding an Inquiry Into the Commission Chairman
Patient Reportedly Falls from Moving Ambulance at YCM Hospital
MPSC Student Agitation
A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.
Marathi News Esakal
www.esakal.com