रिंगरोड विशेष महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

दृष्टिक्षेपात प्रकल्प
१६६ किलोमीटर - रिंगरोडची लांबी 
२३०० हेक्‍टर - जागेची गरज
१४००० कोटी - अपेक्षित खर्च

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव महामंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर समृद्धी महामार्गानंतर विशेष महामार्गाचा दर्जा मिळणारा हा राज्यातील दुसरा महामार्ग ठरणार आहे.

कर्ज उभारणी शक्‍य होणार
‘एमएसआरडीसी’कडून पहिल्या टप्प्यात ६६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यास विशेष महामार्गाचा दर्जा मिळाल्यास त्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होण्याबरोबरच नाबार्डसह सिडको, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेसह विविध बॅंकेचे कर्ज काढणे शक्‍य होणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला जोडणारा मार्ग आणि ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी ‘एमएसआरडसी’ने केली आहे. हा रिंगरोड २००७ पासून प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. ऑगस्ट २०११ मध्ये शासनाने ‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडला मान्यता दिली. या प्रक्रियेदरम्यान अनेक प्रश्‍न उभे राहिले. प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोडऐवजी नव्याने आखणी केली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात दोन रिंगरोड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम झाल्यामुळे तो लवकरच राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यावर निर्णय घेण्यासाठी ‘एमएसआरडीसी’चे मुख्य अधिकारी राधेशाम मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबई येथे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये या रिंगरोडच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यामध्ये रिंगरोडला ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात प्रकल्प
१६६ किलोमीटर - रिंगरोडची लांबी 
२३०० हेक्‍टर - जागेची गरज
१४००० कोटी - अपेक्षित खर्च

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ring Road special highway