वरसगाव, पानशेतभोवती होणार रिंगरोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - निसर्गाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धरणांभोवती स्वतंत्र रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. 

पुण्यातील अनेक पर्यटक वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि खडकवासला परिसरात जातात. त्याला पर्याय म्हणून आता वरसगाव आणि पानशेत परिसर पर्यटनासाठी खुला करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही धरणांच्या भोवती पर्यटकांसाठी रिंगरोड तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या दोन्ही रिंगरोडसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च येणार आहे.

वरसगाव धरणाच्या भोवती रिंगरोडसाठी रस्ता बांधण्यात येणार आहे. धरणाच्या उजव्या बाजूला वरसगाव ते लवासा हा २८ किलोमीटरचा रस्ता बनविण्यात येईल, तर डाव्या बाजूला गडले मार्गे लवासापर्यंत ३२ किलोमीटरचा रस्ता बांधणार आहे. पानशेतच्या भोवती ६१ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित आहे. डाव्या बाजूला पानशेत-जिवसी-टेकपोळ आणि घोळ रस्ता ते पानशेत धरण असा मार्ग असेल. या भागात रिंगरोड झाल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच वळतील, असा विश्‍वास या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.

निसर्गसौंदर्य दुर्लक्षित
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोसे खोऱ्यातील वरसगाव धरण सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे; तर आंबी नदीवरील पानशेत धरण ५० किलोमीटर अंतरावर आहे. या धरण परिसरात डोंगरमाथ्यावर, उतारावर दाट झाडी आणि औषधी वनस्पतींचे भांडार आहे. कच्च्या रस्त्यांमुळे पाऊस झाल्यानंतर जाणे अवघड होते. त्यामुळे या भागात निसर्गसौंदर्य असूनही पर्यटकांची वर्दळ नसते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ringroad varasgaon panshet