
निरगुडसर : कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते हे जवळे (ता.आंबेगाव) येथील ऋषिकेश संजय खालकर या विद्यार्थ्यांने दाखवून दिले असून त्याने आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए (सनदी लेखापाल) ची परीक्षा उतीर्ण होण्याची किमया केली असुन त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.