सोपलचे यश
ऋषिकेश सोपल याचे सीए परीक्षेत यश
वैराग : येथील ऋषिकेश दिलीप सोपल याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले. ऋषिकेशने लहानपणापासूनच शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या. तसेच इयत्ता सातवीत असताना रॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवून त्याने आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडली. त्याची निवड प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालयात देखील झाली होती. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही ऋषिकेशने आपली क्षमता सिद्ध केली. स्टुडंट्स ऑलिम्पिक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले. पुढे मुंबईतील विले पार्ले येथील नरसी मोनजी कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण करत त्याने लेव्हल-१ परीक्षाही उत्तीर्ण केली. या सर्व यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणून ऋषिकेशने चार्टर्ड अकाउंटंट ही कठीण समजली जाणारी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कुटुंब, शिक्षक व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

