
आंबेठाण : सध्या राज्यात परवाना घेऊन शस्र बाळगणाऱ्यांचे वेगवेगळे प्रताप समोर येत आहे. स्वतःच्या रक्षणासाठी दिलेले शस्र परवाने अनेकजण दादागिरी करण्यासाठी किंवा दुसऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी वापरत आहेत.खरंच एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर त्याला स्वरक्षणासाठी मागणी केल्यास शासनाकडून शस्त्र परवाना दिला जातो.उद्योगनगरी समजल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात तब्बल २०९ नागरिकांना आजवर शस्र परवाने दिले गेले आहेत.