Pune News : महागाईने ठेकेदारांनी कामे ठेवली अर्धवट; काम पूर्ण न केल्यास ठेकेदारांना कारवाईचा इशारा

आरएमसी प्रकल्प चालकांनी वाढलेले सिमेंट काँक्रिटचे दर, त्याचसोबत डिझेल, खडी यासह अन्य साहित्याचे दर वाढल्याने शहरातील रस्ते बांधणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Sakal
Updated on

पुणे - आरएमसी प्रकल्प चालकांनी वाढलेले सिमेंट काँक्रिटचे दर, त्याचसोबत डिझेल, खडी यासह अन्य साहित्याचे दर वाढल्याने शहरातील रस्ते बांधणीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. ठेकेदारांना ज्या रकमेत काम पूर्ण करायचे होते, त्यापेक्षा कमी काम झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी निधी द्या अशी मागणी ठेकेदार करत आहेत. त्यावर प्रशासनाने लहान कामांना भाववाढ सूत्र लागू नसते. त्यामुळे महागाई वाढली तरी काम पूर्ण करावेच लागेल, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा ठेकेदारांना दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com