चाकणमध्ये वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान
वाढत्या गुन्हेगारीचे चाकण पोलिसांसमोर आव्हान

चाकणमध्ये वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान वाढत्या गुन्हेगारीचे चाकण पोलिसांसमोर आव्हान

Published on

चाकण, ता. २ : येथील औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जाणारा परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला आहे. मोठ्या कंपन्या, कारखाने, वाढती लोकसंख्या राज्यासह परराज्यातून आलेला मोठा कामगार वर्ग यामुळे चाकणचे महत्त्व वाढले असले तरी अलीकडच्या काळात येथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चोरी, फसवणूक, मारहाण, बेकायदेशीर दारू, गांजा विक्री, खून, सायबर गुन्हे यांसारख्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहत परिसर व चाकण शहर व महाळुंगे परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी तसेच भरदिवसा चौकात, वर्दळीच्या रस्त्यावर व वाहनतळावर पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. पोलिस तपासात अनेक चोऱ्या उघड झाल्या आहेत. काही दुचाकी चोरांच्या टोळ्या जेरबंद करण्यात आल्या आहेत. मात्र काही प्रकरणातील गुन्हेगार मोकाट फिरतात. त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
चाकण हे औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेले शहर आहे. औद्योगिक वसाहतीजवळील गावांचाही मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास झालेला आहे. पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन, नागरिक यांचा समन्वय साधला तरच सुरक्षित आणि शांत चाकण, औद्योगिक वसाहत परिसर राहील असे नागरिक, कामगार, उद्योजक यांचे म्हणणे आहे.

ऑनलाइन फसवणुकीत वाढ
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. चाकण, महाळुंगे, औद्योगिक वसाहत परिसरात किरकोळ वादातून होणाऱ्या मारहाणीच्या घटनाही वाढत आहेत. कोयता दाखवणे, कोयत्याने हल्ला करणे, सार्वजनिक ठिकाणी भांडणे, रस्त्यावर वाद त्यातून होणारी हाणामारी, खून असे प्रकार वाढत आहेत. यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ऑनलाइन फसवणूक, बनावट कॉल्स, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नियंत्रणासाठी उपाययोजना
याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, महाळुंगे उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी , चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले की, गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणे, रात्रीची गस्त वाढवणे, नागरिकांशी थेट संवाद साधणे यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, संशयास्पद हालचाली तात्काळ कळवाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com