Cyber Fraud Case
esakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - पुण्यासह महाराष्ट्रातील शहरी भागात घरगुती गॅस सेवा देणाऱ्या (MNGL) च्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बोगस ॲप्स, फ्रॉड कॉल, खोटे बिल एसएमएस, व्हॉट्सॲप संदेश आणि बनावट कस्टमर केअर नंबरच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांना जाळ्यात ओढले जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाबाबत कमी माहिती असलेले ग्राहक बळीचा बकरा होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिस्थितीचा सखोल उहापोह करणे अत्यावश्यक ठरते.