रितेश जाधव यांची लंडन येथील ब्रुनेल विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड; प्रबंधाच्या आधारे निवड व शिष्यवृत्ती
MDH26B05051
रितेश जाधव
........
रितेश जाधवची लंडन उच्च शिक्षणासाठी निवड
.........
माढा : मूळचा विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील रितेश संतोष जाधव याची डिझाईन क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी लंडन येथील ब्रुनेल विद्यापीठात निवड झाली आहे. तो लंडनाला उच्च शिक्षणासाठी नुकताच रवाना झाला आहे. श्री. जाधव याचे दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील साधना विद्यालयात झाले. नंतर पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठात बॅचलर ऑफ डिझाईनमधून पदवीचे शिक्षण घेऊन २०२५ मध्ये पदवी मिळवल्यानंतर त्याने सादर केलेल्या प्रबंधाच्या आधारे त्याची उच्च शिक्षणासाठी ब्रुनेल विद्यापीठ लंडन येथे निवड झाली. त्याला विद्यापीठाची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. याशिवाय रितेश याला चित्रकलेची आवड होती. त्याने काढलेली निसर्गचित्रे व इतर कलाकृती याचे मुंबईतील वरळी येथील नामांकित नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

