Road Block: तांबडेमळा येथे रस्ता अडविल्याने रविवार पासून ३०० हून अधिक कुटुंबांचे दळवळण थांबले; दगड, काटेरी फांद्यांमुळे वाहतूक ठप्प

तांबडेमळा येथे रस्ता अडविल्याने ३०० हून अधिक कुटुंबांचे २६ तासांपासून दळणवळण ठप्प; ग्रामस्थ संतप्त, प्रशासनाकडे तातडीने रस्ता मोकळा करण्याची मागणी
Village Dispute: 300 Families Stranded as Road Blocked in Tambademala

Village Dispute: 300 Families Stranded as Road Blocked in Tambademala

Sakal

Updated on

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला तांबडेमळा (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीतून चिमणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड, गोटे व काटेरी फांद्या टाकून रविवारी(ता.१७)रस्ता अडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरातील सुमारे ३०० हून अधिक कुटुंबांचा २६ तासाहून अधिक काळ दळणवळणाचा मार्ग बंद पडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता सुरू करून द्यावा, अशी मागणी तांबडे मळा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्राजक्ता तांबडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com