
वेल्हे : राजगड तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वेल्हे ते अठरागाव मावळ परिसरातील मार्गावरील अतिदुर्गम भट्टी खिंडीतील रस्ता खचला आहे. हा रस्ताच वाहून जाऊन या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.