

SPU26B05790
अहिल्यानगर ः नारायणगव्हाण येथील चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण घालताना सचिन शेळके.
नारायणगव्हाणमधील चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करा
ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण
पारनेर, ता.१८: अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील प्रलंबित चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, भूधारकांना योग्य मोबदला द्यावा, वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, या विविध मागण्यांसाठी लोटांगण आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नारायणगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डांबरी रस्त्यावर लोटांगण घातले.
सोमवारी (ता.१८) नारायणगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने लोटांगण आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शरद पवळे, शिवाजी नवले, संतोष कोहकडे, रमेश कोहकडे, रामचंद्र अवचिते, संजय साबळे, बबनराव गुंड, किरण ठुबे, बाजीराव जगदाळे, जनार्दन खोबरे, सचिन कांडेकर, गजेंद्र सरडे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नारायणगव्हाण येथील महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. वाढती वाहनसंख्या आणि अरुंद रस्त्यामुळे गाव परिसरात वारंवार अपघात होतात. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन आणि पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ९४५ मीटरपैकी ८१५ मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र अद्याप १२० ते १५० मीटरचे काम प्रलंबित आहे. नारायणगव्हाण गाव रस्त्याच्या मध्यभागी असल्याने ग्रामस्थांचा या मार्गावर मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी वापर होत असतो. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी उर्वरित चौपदरीकरण तातडीने पूर्ण करावे. भूधारकांना योग्य मोबदला द्यावा, कामात दिरंगाई करणाऱ्या निष्क्रिय व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात महामार्गावर कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.
.................
नारायणगव्हाणसह अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शासनाची अंत्ययात्रा काढण्यात येईल.
-सचिन शेळके, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.