

Police and emergency teams at the accident site on Shirur–Malthan road following the fatal crash.
Sakal
कवठे येमाई : शिरूर-मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ सोमवारी (ता. १६) भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी मोटारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.