खड्डेमय रस्त्यात पडून जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का?

महापालिकेच्या ठेकेदाराकडून रस्ते खोदाई केल्यानंतर तो दुरुस्त कोण आणि किती दिवसांत करणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Road Issue
Road IssueSakal
Summary

महापालिकेच्या ठेकेदाराकडून रस्ते खोदाई केल्यानंतर तो दुरुस्त कोण आणि किती दिवसांत करणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उंड्री - हांडेवाडी रस्त्यावर सय्यदनगर-चिंतामणीनगर दरम्यान जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई (Road Digging) केली. मात्र, राडाराडो रस्त्यालगत पडला असून, खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूककोंडी (Traffic) होऊन वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यावर पडून अपघातात एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला (Administrative) रस्ते दुरुस्तीचा मुहूर्त मिळणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Road Issue
पुणे : वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

महापालिकेच्या ठेकेदाराकडून रस्ते खोदाई केल्यानंतर तो दुरुस्त कोण आणि किती दिवसांत करणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केबल, ड्रेनेज आणि जलवाहिनी दुरुस्तीसाठी वारंवार रस्त्यांची खोदाई केली जाते. रस्ता दुरुस्त केला की नाही याचा जाब पालिका प्रशासनातील अधिकारी का विचारत नाहीत, त्यांची जबाबदारी नाही का, अशी विचारणा वाहनचालक खंडेराव जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, हा रस्ता डी.पी.मध्ये मंजूर असून, त्याप्रमाणे रस्ता रुंदीकरण कऱण्यासाठी मुख्य खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com