Manchar News : ४५ वर्षांपासून बंद असलेला रस्ता हिंदू-मुस्लिम सामंजस्यातून खुला

अवसरी खुर्द गावठाणातील गेल्या ४५ वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता हिंदू-मुस्लिम समाजाच्या सामंजस्यातून वाहतुकीसाठी झाला खुला.
avsari khurd road
avsari khurd roadsakal
Updated on

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावठाणातील गेल्या ४५ वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला रस्ता हिंदू-मुस्लिम समाजाच्या सामंजस्यातून व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे गावात एकतेचे व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com