Chakan MIDC : उपमुख्यमंत्री अजित पवार चाकण दौऱ्यावर येणार असल्याने एमआयडीसी प्रशासन अचानक ‘अलर्ट मोड’वर जाऊन युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे.
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. ८) चाकण परिसरात येणार असल्याची चाहूल लागताच एमआयडीसी प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले. रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु झाली असून उपमुख्यमंत्र्यांसाठी डांबरी रस्त्याच्या पायघड्या घातल्या जात आहेत.