Pune News : रस्ते दुरुस्ती की बोगस बिलांचा मार्ग? गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर निर्णय आवश्‍यक

पुणे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्यासाठी ५७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
road work

road work

sakal 

Updated on

पुणे - शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे बुजविण्यासाठी ५७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाच रस्ते पुनर्स्थापनेची कामे मुख्य पथ विभागाकडे सोपविण्यात आली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना यंदा विक्रमी ३०१ कोटी रुपयांचा निधी देऊनही स्वतंत्रपणे त्याच स्वरूपाची कामे होत असल्याने एकाच ठिकाणी दुहेरी कामे दाखवून बिले काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पथ विभागातील अभियंत्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहेच, पण हे रोखण्यासाठी प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com