सुप्यात रस्ते सुरक्षाविषयक जागृती

सुप्यात रस्ते सुरक्षाविषयक जागृती

Published on

सुपे, ता. १७ : सुपे (ता. बारामती) येथे रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स कंपनीच्या येथील कार्यालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुपे, मोरगाव व काऱ्हाटी मार्गावरील जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालकांना रस्ते सुरक्षा पुस्तक, पत्रके व पेन देऊन जनजागृती केली.
हेल्मेट आणि सीटबेल्ट घालणे, वेग मर्यादा पाळणे, मद्यपान करून गाडी चालवू नये, गाडी चालवताना मोबाइल फोन वापरू नये, जास्त वेगाने गाडी चालवणे टाळा, झेब्रा क्रॉसिंग वापरून पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करा आणि चुकीच्या बाजूने गाडी चालवणे काटेकोरपणे टाळा आदी आवश्यक वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जागृती केली.
रस्ते अपघात कमी व्हावेत या हेतूने हा उपक्रम राबवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुमन बॅनर्जी, सुरक्षा प्रभारी शिब शंकर कुइला, नियोजन व्यवस्थापक राजीव कुमार सिंग, अभियंता गणेश कुमार, सुरक्षा अधिकारी अमिया कीर्तनिया, भांडारगृह प्रभारी प्रवीण कुमार तिवारी, अशोक साहू, विद्युत अभियंता रोशन कुमार झा आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com