Road Safety campaign Pargaon karkhan Police Station pune traffic rule
Road Safety campaign Pargaon karkhan Police Station pune traffic rule sakal

Pune News : पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान निमित्त वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन वाहुतुकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथे पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान निमित्त वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन वाहुतुकीचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे वतीने बुधवार (दि.11) ते मंगळवार (दि.17) रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला असून त्या अनुषंगाने येथे पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, वाहतूक पोलीस अंमलदार गणेश जोरी,

चंद्रकांत गव्हाणे, गजानन डाके, नवनाथ राक्षे, महिला पोलिस अंमलदार शामल तळेकर यांनी शिंगवे चौक येथे आज शनिवारी सकाळी चारचाकी वाहन चालक, मोटारसायकलस्वार यांना थांबवून पुष्पगुच्छ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना दिल्या तसेच रस्ता सुरक्षा संबधी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com