स्वारगेट जेधे चौकात रांगोळीतून रस्ता सुरक्षेचा संदेश; स्तुत्य उपक्रमाचे प्रवाशांनी केले स्वागत

Road safety message has been given through Rangoli at Swargate Jedhe Chowk in Pune.jpg
Road safety message has been given through Rangoli at Swargate Jedhe Chowk in Pune.jpg

पुणे : रस्ताही तुमचाच वेळही तुमचाच, घाई केली तर मृत्यू ही तुमचाच, जीव सांभाळा दुर्घटना टाळा, वाहतुकीचे नियम पाळा, रस्ता सुरक्षा जीवन सुरक्षा, वाहने चालवताना मोबाईलचा वापर करू नये, अशा सारखे सुरक्षेबाबतचे विविध संदेश देणारी रांगोळी स्वारगेट येथील जेधे चौकात साकारण्यात आली.

अपघाततात जीव गमावलेल्या व्यक्तीचा स्मरण दिनाच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालय, स्वारगेट वाहतूक पोलीस विभाग व सत्यसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वारगेट येथील जेधे चौकात भव्य रांगोळी साकारण्यात आली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन अशा प्रबोधनपर रांगोळीतून संदेश देणारी रांगोळी पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी व नागरिकांची गर्दी करत या उपक्रमाचे कौतुक केले.

या रांगोळीचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वाळीव, मोटार वाहन निरीक्षक अमरसिंह गवारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सत्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एकनाथ ढोले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com