थेऊरफाटा ते थेऊर गाव रस्त्याची झाली दूरवस्था

थेऊरफाटा ते थेऊर गाव रस्त्याची झाली दूरवस्था
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी ये-जा करण्यासाठी असलेला पुणे-सोलापूर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

प्रसन्नने त्याच्या वडिलांच्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. वाचा सविस्तर 

पुणे-सोलापूर महामार्गावरुन नगर रस्ताकडे जाणारा व अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी ये जा साठी करण्यासाठी वापरत असलेल्या पुणे-सोलापुर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव या रस्त्याची मोठ्या प्रमाणात अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. 

अष्टविनायक गणपती विकास आराखड्यांतर्गत चार वर्षापुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुणे-सोलापूर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव ते केसनंद मार्गे लोणी कंद या रस्त्यासाठी १६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजनही झाले होते. या रस्त्याचे काम मे. पिसीआयएल हॅम अष्टविनायक थेऊर प्रा. ली. या कंपनी करत आहे. लोणी कंद ते कोलवडी या दरम्यानचे काम चालु असले तरी, पुणे-सोलापुर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव या दरम्यानचे काम मात्र सुरु झालेले नाही. 

रस्त्यावर खड्डेच खड्डे व धुळीचे साम्राज्य- पुणे-सोलापुर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव या रस्त्याची मोठ्या प्रमानात अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे मोठे असल्याने, चारचाकी वाहन चालकांना मोठ्या प्रमानात मनस्ताप सोसावा लागत आहे. पुणे-सोलापुर महमार्गावरुन थेऊर, कोलवडी यासारख्या गावात येजा करणाऱ्या नागरीकांना तर रोजज तोरेवरची कसरत करतच प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने, रस्त्यावर चोविस तास धुळीचे साम्राज्य असते. रस्त्यात खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावकरुन येजा करणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावा , अशी मागणी या रस्त्यावरुन दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालकांनी केली आहे.

पुणे शहरात गेल्या २४ तासात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर     

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काम रखडले- याबाबत अधिक माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई म्हणाले, या रस्ता रुंदीकरणांचे व दुरुस्तीचे काम ७ मार्च २०१९ रोजी सुरु केले होते. परंतु थेऊर फाटा ते थेऊर गाव या दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला रस्त्यालगतच्या ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्याबरोबरच, उच्च न्यायालायमार्फत याचिका दाखल करुन स्थगिती दिली आहे. यामुळे काम  बंद पडलेले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागानेही उच्च न्यायालयात योग्य ती बाजू मांडून, रस्त्याचे काम सुरु करण्यास परवानगी मागितलेली आहे. 

'प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याने न्यायालयात गेलो'...
शेतकऱ्यांच्या वतीने 'सकाळ'शी बोलताना याचिकाकर्ते शेतकरी 
बबन शितोळे म्हणाले, रस्त्याचे काम सुरु करण्यापुर्वी शासनाने शेतकऱ्यांना भूसंपादन, जमिनीची  मोजणी, जमिनीचे व झाडांचे मुल्यांकन या संदर्भात कोणत्याही  प्रकारची माहिती दिली नाही.  पूर्वसुचना न  देता झाडे तोडली व शेतातील पिकांची नासधूस केली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.  प्रशासनाने शेतकऱ्यांना  विश्वासार्थ घेतले नाही. तसेच त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधीही दिली नाही. यामुळे  शेतकरी वर्ग हा प्रशासनावर नाराज झाला  आहे. आमचा रस्ता रुंदीकरणाला अथवा रस्त्याच्या कामाला विरोध नाही, केवळ आमचे समाधान करावे एवढीच प्रशासनाकडुन अपेक्षा आहे.

४ एप्रिल रोजी या पुरस्कार सोहळ्याचा उत्तरार्ध रंगणार आहे. वाचा सविस्तर

डांबरीकरण करण्यासाठी बैठक बोलवणार : आमदार अशोक पवार- शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाबाबत उच्च न्यायालायमार्फत याचिका दाखल करुन स्थगिती दिल्याने, सध्या तरी रस्ता रुंदीकरणाचे काम करणे अवघड आहे. कोलवडी ते केसनंद मार्गे लोणी कंद या रस्ता रुंदीकरणाचे काम अंतीम टप्प्यात आलेले आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन, या रस्त्याच्या रुंदीकरणाऐवजी आहे, सध्या त्याच रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी बैठक बोलवणार आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पुढील तीन ते चार दिवसात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही आमदार अशोक पवार यांनी स्पष्ठ केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com