वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

हडपसर : अपघाताच्या घटना नित्याच्या बनत चालल्या आहेत. भरधाव वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम न पाळणे या गोष्टी अपघाताचे मुख्य कारण बनत आहेत. तरुणवर्गामध्ये धूम स्टाईलने वाहन चालविण्याची क्रेझ अशा अपघातांना निमंत्रण देत आहे. वाहतूक सुरक्षेबाबत आपल्याकडे चांगले नियम आहेत; पण ते पाळले जात नाहीत हेच दुर्दैव आहे. वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे, असे मत हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस नरिक्षक जगन्नाथ कळसकर यांनी व्यक्त केले. 

हडपसर मेडिकल असोसिएशन व वाहतूक विभाग हडपसर यांच्या संयुक्त विदयमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रिक्षा, टेम्पो, बसचालक, वाहतूक पोलिस यांची मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराचे उदघाटन कळसकर यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात 200 जणांची नेत्र तपासऩी करण्यात आली. नेत्रतज्ञ डॅा. महेश गडचे यांनी ही तपासणी केली.

या शिबिरात हडपसर मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. शंतनू जगदाळे, पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, डाॅ. राजेंद्र सांळुखे, डाॅ.गणपत शितोळे, डाॅ.सुहास लांडे, डाॅ.राहूल झांजुणॆ, डाॅ.सचिन आबणे, डाॅ.प्रशांत चौधरी सहभागी झाले.

डाॅ. जगदाळे म्हणाले, वाहतूक पोलिस व टेम्पो, रिक्षाचालक यांनी वर्षातून एकदा नेत्र व आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळेच दरवर्ष हडपसर मेडीकल असोसीएशनच्यावतीने आम्ही दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहात नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतो.

Web Title: Road Traffic safety drive in Hadapsar