
वारजे : गणपती माथा ते वारजे उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या ड्रेनेज आणि २४ तास पाणीपुरवठा विभागाने या रस्त्यावर काही कामे केली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे सपाटीकरण व्यवस्थित न केल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना अंदाज येत नाही, परिणामी छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत.