पुण्यात पोलिसाच्या नव्हे तर, माकडांच्या भीतीने रस्ते सामसूम

Roads are Empty due to fear of monkey in pune
Roads are Empty due to fear of monkey in pune
Updated on

पुणे :  मिळताच पाय मोकळे करण्यासाठी फिरणारे पोलिस दिसताच पळापळ असल्याचे चित्र लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र आपण पाहिले असेल. परंतु आज पोलीसांऐवजी माकडांच्या टोळक्‍यांनी हजेरी लावताच नागरिकांची पळापळ झाली. रविवार पेठेत सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. तेव्हा अनेकांनी पळ काढत दारे खिडकी बंद करण्याचा प्रकार पाहावयास मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गेले चाळीस दिवसांहून अधिक काळ घरात अडकून पडल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यातल्या त्यात विरंगुळा म्हणून पोलिस नाहीत, हे पाहून अनेक जण घराच्या परिसरात चकरा मारताना दिसतात. पोलिस दिसताच पुन्हा घरात धूम ठोकणे, हे दररोजचे चित्र. त्यात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा परिसर म्हणजे सर्वांत हॉटस्पॉट. त्यामुळे अन्य भागापेक्षा तेथील बंदोबस्त तसा कडकच. 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रविवार पेठेच्या भागात माकडांचे एक टोळके आले. अन्‌ एकच गडबड उडाली. पटापट दरवाजा, खिडक्‍या बंद करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली.अचानक आलेल्या या माकडांच्या टोळक्‍याने काही क्षणात रस्ता सामसूम झाला. अन्‌ मग घराच्या खिडकीतून त्यांची छबी टिपण्यासाठी लगबग सुरू झाली. काही या गडबडीतही त्यांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकले. तर उन्हाळामुळे काही जणांनी घराच्या पत्र्यावर, गच्चीवर पापड, सांडगे अशा काही वस्तू वाळण्यासाठी ठेवल्या होत्या. त्यांची नासधूस माकडांनी केली. अर्धातासाने ही माकडे आल्या त्या मार्गाने पुन्हा निघून गेली. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या सवलतीची म्हणजे दहाची वेळ झाली आणि पुन्हा खरेदीसाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली. 

#Lockdown3.0 : घसा ओला करण्यासाठी तळीराम रस्त्यावर; दारुच्या दुकानांबाहेर लाबंच लांब रांगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com