घरातून 33 तोळे सोन्याचे दागिने लंपास

home
home

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार वस्तीवर आज मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी संभाजी रामदास हिंगे यांच्या घराचा दरवाजा पहारीने तोडुन आतमध्ये प्रवेश करुन कपाटाचे कुलुप तोडुन 33 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागीण्यांसह 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण साडे सात लाख रुपये किमंतीचा एैवज घेऊन पोबार केला या जबरी चोरीमध्ये हिंगे यांच्या बहीण रुपाली शैलेश काळे यांनी चोरट्यांना प्रतीकार केल्याने चोरट्यांनी त्यांचे पाय व डोके दाबुन हाताने मारहाण केल्याने त्या जखमी झाल्या.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार उन्हाळ्याचे दिवस असल्याने संभाजी हिंगे व त्यांच्या पत्नी सुनिता हिंगे व मुलगा हर्षवर्धन टेरेसवर झोपले होते वडील रामदास हिंगे घराच्या ओट्यावर झोपले तर रुपाली काळे या घराच्या कड्या आतुन लाऊन आतमध्ये झोपल्या होत्या.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बहीण रुपाली काळे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने संभाजी हिंगे उठुन घराच्या खाली पाहीले असता एकजण पळताना दिसला ते लगेच खाली घरात आले घराच्या दोन्ही खोल्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते कपाटातील दागीण्यांची पेटीही नव्हती घराच्या पाठीमागे दागीणे ठेवण्याचे बॉक्स रिकामे पडलेले होते आत येऊन रुपाली काळे यांची विचारपुस केली असता तीने सांगीतले दिड वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाजाची  कडी कोयंडा पहारीने उचकटवुन चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उचकटलेला जोरात आवाज आल्याने रुपाली काळे यांना जाग आली तीन चोरटे घरात घुसले होते काळे त्यांना प्रतिकार करु लागल्याने त्यापैकी एकाने पाय दाबुन धरले व एकाने डोके दाबुन धरुन हाताने मारहाण करत "झोप गप्प खाली ओरडु नको" अशी धमकी दिली व पलंगाला डोके आपटले व मारहाण केली तर तिसऱ्याने कपाट उचकून कपडे अस्ताव्यस्त करुन दागिन्यांचे बॉक्स घेऊन निघुन गेले.

या झटापटीत रुपाली काळे जखमी झाल्या. त्यांनंतर संभाजी हिंगे यांनी सामानांची पाहणी केली असता रुपाली काळे यांचे एकुण 22 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, राणी हार, ठुशी, नेकलेस, अंगठी, बांगड्या, कर्णफुले, नथ व साखळी आणि सुनिता हिंगे यांचे एकुण आठ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, नेकलेस, कानातील झुबे, संभाजी हिंगे एकुण तीन तोळे वजनाचे सोन्याची अंगठी व असा एकुण 33 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व कपड्याच्या खिशातील रोख 8500 रुपये असा एकुण 7 लाख 32 हजार 200 रुपयांचा माल चेरुन नेला तर वस्तीवरीलच दशरथ शंकर हिंगे यांच्या घराचे कडी तोडुन पेटीतुन रोख 2200 रुपये चोरुन नेले माजी सरपंच बी.एन.हिंगे यांनी पोलीसांना फोन केल्यांनंतर उपविभागीय पोलिस आधिकारी राम पठारे व पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तपासाच्या दुष्टीने पथके रवाना केली आहेत चोरट्यांची संख्या तीन असल्याचे पोलिसांनी सांगीतले श्वान पथकातील दुर्गा श्वानाने घरापासुन दिड किलोमीटर अंतरावरील डांबरी रस्त्यापर्यंत माग दाखवला ठसेतज्ञांनीही घरातील वस्तुवरील ठस्यांचे नमुने घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com